🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आता या चित्रपटाचे शो चक्क रद्द करण्यात आले आहेत. या चित्रपटांच्या निर्मात्यांना चांगलाच फटका बसला आहे. निर्मात्यांच १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता या चित्रपटाच्या अपयशानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. मुलाखतीमध्ये ते सम्राट पृथ्वीराज चित्रपटाच्या अपयशावर बोलत म्हणाले, “या चित्रपटाची कथा सनी देओलला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली गेली होती. १८ वर्षांपूर्वी ते स्वत: या चित्रपटाची निर्मिती करणार होते. पण त्यावेळी त्यांना पाठिंबा मिळाला नाही आणि आता या चित्रपटाला राजकीय लक्ष्य केले गेले आहे. हेच त्याच्या अपयशाचे मोठे कारण आहे.”
‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप –
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. नंतर शनिवारी १२.६० कोटी आणि रविवारी १६.१० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
