मुंबई : भारताविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंडच्या (IND vs IRE) संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडने संघात १४ खेळाडूंचा समावेश केला आहे. अष्टपैलू सिमी सिंग आणि शेन गेटकेट, हे दोघेही या वर्षाच्या सुरुवातीला टी-२० विश्वचषक पात्रता खेळलेल्या संघाचा भाग होते, त्यांना वगळण्यात आले आहे.
अव्वल मानांकित डोहेनीचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत टी-२० सामन्यांतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी वरिष्ठ संघासोबत नेट बॉलर म्हणून यूएईला गेलेल्या वेगवान गोलंदाज ओल्फर्टने या मोसमात टी-२० स्पर्धेत सहा आणि लिस्ट ए फॉरमॅटमध्ये सहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याचाही आयरिश संघात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही खेळाडूंना क्रिकेट आयर्लंडने नुकतेच रिटेनर कॉन्ट्रॅक्ट दिले होते आणि ते आता अँड्र्यू बालबिर्नीच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग आहेत.
Ireland squad for the T20 series against India:
Andrew Balbirnie (C), Mark Adair, Curtis Campher, Gareth Delany, George Dockrell, Stephen Doheny, Josh Little, Andrew McBrine, Barry McCarthy, Conor Olphert, Paul Stirling, Harry Tector, Lorcan Tucker, Craig Young.
— Johns. (@CricCrazyJohns) June 15, 2022
या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. भारतीय संघ पाचव्या कसोटीच्या तयारीसाठी इंग्लंडला जाणार आहे. अशा स्थितीत मुख्य खेळाडू संघात नसतील.
आयर्लंड संघ –
अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅककार्थी, कोनर ओल्फर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

