Share

Ranaji Trophy : मुंबईच्या यशस्वी जयस्वालचा धूम धडाका, ठोकले सलग तिसरे शतक

Published On: 

मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा २० वर्षीय फलंदाज यशस्वी जैस्वालने दुसऱ्या उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्धच्या दोन्ही डावांत शतक झळकावले आहे. जयस्वालने पहिल्या डावात १०० धावा केल्या होत्या. या डावखुऱ्या फलंदाजाने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडविरुद्धही १०३ धावा केल्या होत्या. गेल्या चार डावांतील जयस्वालचे हे तिसरे शतक आहे. दुसऱ्या टोकाला वसीम जाफरचा भाचा अरमान जाफरनेही शतक झळकावले आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत २५० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबईच्या आघाडीने ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

यशस्वी जैस्वालने चालू हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये केवळ दोन सामने खेळले आहेत. अलूर येथे खेळल्या गेलेल्या उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने पहिल्या डावात ३५ धावा आणि दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या होत्या. त्याची आयपीएल हंगामातही जबरदस्त कामगिरी राहिली होती. मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात सध्या यशस्वी जयस्वाल ३०४ चेंडूचा सामना करत १४३ धावांवर खेळत आहे. जयस्वालचे हे मागील दोन सामन्यातील तिसरे शतक आहे. त्याने अनुक्रमे १०३, १०० व नाबाद १४३ धावा केल्या आहेत.

रणजी ट्रॉफीच्या या सेमी फायनल सामन्यात मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश आमने-सामने आहेत. या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३९३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेश चा संघ १८० धावांत गारद झाला. दुसऱ्या डावाची सुरुवात करताना मुंबईच्या सलामीवीरांनी धमाकेदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मुंबईचा कर्णधार पृथ्वी सेवा ६४ धावा करून बाद झाला. यानंतर सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल (१४३) आणि अरमान जाफर(१२५) यांनी संघाच्या धावसंख्येच डोंगर उभा केला. सध्या सामन्यांमध्ये मुंबईची स्थिती दुसऱ्या डावात ३५० धावांवर एक गडी बाद अशी आहे. त्याचबरोबर मुंबईने या सामन्यात ५६० धावांची आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!