Share

“जैसे ज्याचे कर्म तैसे JC देतो रे ईश्वर”, भातखळकरांचा नवाब मलिकांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना इडीने दाऊद यांच्या निकटवर्तीयांकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक हे जमीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. त्यातच आता न्यायालयाने मलिकांची कोठडी अठरा एप्रिल पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे त्यांना अजून दोन आठवडे कोठडीत राहावे लागणार आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी नवाब मलिकांना टोला लगावला आहे.

“राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे JC देतो रे ईश्वर”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान नवाब मालिक यांची कोठडी आज संपली होती. यामुळे त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले होते. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

दरम्यान नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप करण्यात आला असून दाऊदच्या टोळीशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांच्या घरावर धाड मारली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारीला नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मालिकांना सुरुवातीला ७ मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती, यानंतर त्यांना ४ एप्रिल आणि आज १८ एप्रिल पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 : महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सुपरफ्लॉप..! जडेजा म्हणतो, “त्याला….”

“भाजपाचा आदेश जसाच्या तसा मानला…”; सचिन सावंतांचा राज ठाकरेंना टोला

‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत बाळासाहेब थोरातांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

“…हाच प्रश्न एकदा मनसुख हिरेनच्या पत्नीला विचारून बघा”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सल्ला

IPL 2022 CSK vs PBKS : पंजाबविरुद्धच्या पराभवासाठी धोनी जबाबदार? सुनील गावसकरांनी काय म्हटलं ते वाचाच!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!