🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२च्या आधी महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. धोनी सीएसकेकडून या मोसमात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. गतविजेत्या संघाची आयपीएल २०२२ मध्ये खराब सुरुवात झाली आहे. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने सलग तीन सामने गमावले आहेत. सीएसकेला रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध ५४ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी धोनीला जबाबदार धरले.
धोनीने या सामन्यात २८ चेंडूत २३ धावा केल्या. या सामन्यानंतर गावसकर म्हणाले, ”तुम्ही पाहत आहात, की धोनी फलंदाजीला आल्यावर मोठे शॉट्स खेळत नाही, पण तो एक-दोन धावा चोरत राहतो आणि त्यामुळे विरोधी गोलंदाजांवर दबाव टाकतो. या सामन्यात तो हे करू शकला नाही आणि इथूनच चेन्नई संघ सामन्यादरम्यान अडकताना दिसला. शिवम दुबे चांगले फटके खेळत होता, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळाली नाही.”
पंजाब किंग्जने २० षटकात ८ गडी गमावून १८० धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ १८ षटकात १२६ धावांवर सर्वबाद झाला. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- VIDEO : ऑस्ट्रेलियाला मिळाला त्यांचा जसप्रीत बुमराह; अॅक्शन पाहून सर्वच झाले अवाक्!
- नवाब मलिकांना मोठा दणका; दोन आठवड्यांनी वाढली न्यायालयीन कोठडी!
- रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक पण शरद पवारांचं काय?; केशव उपाध्येंचा टोला
- “…तर शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे”, आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
- IPL 2022 : काय वेळ आलीय..! चेन्नई-मुंबई गुणतालिकेत तळाशी; ‘हा’ संघ आहे पहिल्या स्थानी!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
