🕒 1 min read
Nawab Malik | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ( ३० नोव्हेंबर ) मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्या जामीन अर्जासाठी सुनावणी झाली होती. याप्रकरणी ईडीच्या विशेष कोर्टानं निर्णय दिला आहे. नवाब मलिक यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जामीन अर्ज ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं फेटाळून लावलेला आहे.
दरम्यान, त्यांच्यावर कुर्ला येथील क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय कारणासाठी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यासंदर्भात मुंबईच्या ईडीच्या विशेष कोर्टात सुनावणी झाली. न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रकरणातील आणखी एक मुख्य साक्षीदार सरदार खान याचा जबाबही निर्णय देताना विचारात घेतल्याचे न्यायालयाने सांगितलं.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. कुर्ल्यातील एका मालमत्तेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकला विविध कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मलिक यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. ईडीने नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डमधील लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये त्यांनी शेकडो कोटींची जमीन एका पैशात खरेदी केल्याचे ईडीने म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Nagnath Kotapalle | ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
- Sanjay Raut | “राज्यपाल अजूनही राजभवनात कसे?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- Ajit Pawar | निवडणुका लागू दे…जनता योग्य जागा दाखवेल ; वाचाळवीर मंत्र्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया!
- Eknath Shinde | शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजेंच्या अनुपस्थितीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांवर अजित पवार भडकले ; म्हणाले,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
