🕒 1 min read
मुंबई : राज ठाकरेंनी गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये घेतलेल्या मेळाव्यात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली, त्यावेळी त्यांनी मशिदीतील लाऊडस्पीकरबाबत काही मुद्दे उचलले होते. तसेच मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशाराचं राज ठाकरेंनी थेट दिला होता.
ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लावले असतील, त्या मशिदी समोरच्या भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं देखील राज ठाकरे म्हणाले होते.
यावर कॉंग्रेस कमिटीचे मेंबर सचिन सावंत यांनी ट्वीट करून राज ठाकरेंवर सडेतोड टीका केली आहे. म्हणाले, इडीची नोटीस आल्यावर हनुमान चालीसा आठवली हे स्पष्ट आहे. पण हनुमान चालीसा का? “भीमरुपी महारुद्रा” मारुती स्तोत्र का नको? भाजपाचा आदेश जसाच्या तसा मानला वाटतो!”
महत्वाच्या बातम्या –
“…तर आम्ही एक मिनिटात पलटी मारतो”; सुजय विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
VIDEO : करियरच्या शेवटच्या मॅचमध्ये रॉस टेलरला अश्रू अनावर; रडता रडता सोडलं मैदान!
“राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत तोपर्यंत…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य
“भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम…”, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
“राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले का?”; आव्हाडांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
