Share

‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत बाळासाहेब थोरातांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच याविषयी आता काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाष्य केले आहे. तसेच कोण होतास तू, काय झालास तू? म्हणत बाळासाहेब थोरातांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की,‘राज ठाकरे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते असून मधल्या काळात त्यांची भाषण लोकप्रिय झाली ती ‘लाव रे तो व्हिडीओ’ या त्यांच्या फॉर्म्युल्यानंतर. परंतु दोनच वर्षांमध्ये त्यांनी एवढा मोठा युटर्न घेतला आहे की, आता त्यांची अवस्था पाहून, कोण होतास तू, काय झालास तू? असे म्हणावे लागेल.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘२०१९ लोकसभा निवडणूकीच्या काळात राज ठाकरेंच्या भाषणामुळे सामान्य जनांमध्ये त्यांच्याविषयी एक आकर्षण निर्माण झाले होते. सर्वत्र फक्त त्यांचीच चर्चा होती. परंतु त्यांनी घेतलेल्या युटर्नने आता सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे’, असे थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!