🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडची सुरुवात चांगली झाली नाही. तो आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने त्याच्या खराब कामगिरीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ”गायकवाडच्या खराब फॉर्मची मला चिंता नाही कारण तो खूप चांगला खेळाडू आहे आणि तो लवकरच पुनरागमन करेल”, असे जडेजाने सांगितले.
ऋतुराजची आतापर्यंतची कामगिरी खूपच खराब झाली आहे. तीन सामन्यांत तो केवळ दोन धावा करू शकला आहे. पहिल्या सामन्यात तो खातेही न उघडता बाद झाला आणि त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात त्याला प्रत्येकी एक अशीच धावसंख्या करता आली. यावरून तो फॉर्ममध्ये किती खराब आहे हे दिसून येते. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो स्लिपमध्ये झेलबाद झाला होता.
या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना जडेजा म्हणाला, “ऋतुराज गायकवाडला आत्मविश्वास देण्याची गरज आहे, कारण तो खूप चांगला खेळाडू आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मला खात्री आहे की तो लवकरच फॉर्ममध्ये येईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 CSK vs PBKS : पंजाबविरुद्धच्या पराभवासाठी धोनी जबाबदार? सुनील गावसकरांनी काय म्हटलं ते वाचाच!
- अखेरच्या क्षणापर्यंत भाजप ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील- देवेंद्र फडणवीस
- राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो व्हायरल ; शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर
- VIDEO : ऑस्ट्रेलियाला मिळाला त्यांचा जसप्रीत बुमराह; अॅक्शन पाहून सर्वच झाले अवाक्!
- नवाब मलिकांना मोठा दणका; दोन आठवड्यांनी वाढली न्यायालयीन कोठडी!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
