Share

“…हाच प्रश्न एकदा मनसुख हिरेनच्या पत्नीला विचारून बघा”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: जगभरातील आनंदी देशांच्या यादीमध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षाही खालच्या क्रमांकावर असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारत हा आनंदी देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानच्या खाली का असा प्रश्न राऊत यांनी विचारला होता. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी राऊतांना (sanjay raut) सवाल करत टोला लगावला आहे.

“आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तान भारताहून सरस आपला देश आनंदी का नाही- इति सर्वज्ञानी संजय राऊत हाच प्रश्न एकदा मनसुख हिरेनच्या पत्नीला विचारून बघा किंवा पालघर साधू हत्याकांड आठवून स्वतःलाच विचारून बघा.”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केला आहे.

नेमके संजय राऊत काय म्हणाले?

देशाचे मोठेपण नेमके कशात असते आणि देशाचा आनंद कशात असतो, यावर एकदा संसदेत चर्चा व्हायला हवी. संसदेतील सर्वच चर्चा आता रटाळ होत आहेत. मोदी भक्तांची संख्या संसदेच्या सभागृहात वाढली आहे. त्यातील अनेकांना विनोदाचे, खिलाडूपणाचे वावडे आहे. त्यामुळे संसदेतील ‘आनंद’ संपला आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिंकला. त्याचा आनंद सोहळा साजरा झाला. पण जागतिक आनंदी देशांच्या यादीत भारत १३६ व्या स्थानावर घसरला. पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर म्हणजे १२१ व्या क्रमांकावर आहे. भाजपा जिंकला म्हणजे देश जिंकला, मोदी जिंकले म्हणजे देश आनंदी झाला, असे जग मान्य करायला तयार नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या:

अखेरच्या क्षणापर्यंत भाजप ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील- देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो व्हायरल ; शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर

VIDEO : ऑस्ट्रेलियाला मिळाला त्यांचा जसप्रीत बुमराह; अ‍ॅक्शन पाहून सर्वच झाले अवाक्!

नवाब मलिकांना मोठा दणका; दोन आठवड्यांनी वाढली न्यायालयीन कोठडी!

रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक पण शरद पवारांचं काय?; केशव उपाध्येंचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!