Share

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील अभिनेता योगेश सोहनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही छोटया पडद्यावरील मालिका अनेक घरांमध्ये लोकप्रिय आहे. या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने नुकतंच या मालिकेमधील शौनकची भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहनीने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्या पोस्टच्या सगळीकडे चर्चा सुरू आहेत.

या मालिकेमधील साजिरी आणि शौनक या दोघांची जोडी लोकप्रिय आहे. या मालिकेमध्ये साजिरीची भूमिका दिव्या पुगावकर साकारत  आहे आणि शौनक ची भूमिका योगेश सोहनी साकारताना दिसत आहे. या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याने योगेशने इंस्टाग्रामवर एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/Ce3s3SiJ9lK/

व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “आज सादर झाला ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा ५०० वा एपिसोड… आपण या ५०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, लेखक, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!”

https://www.instagram.com/p/Ce3M075JbYp/

पुढे अजून एक फोटो शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले, “आज “मुलगी झाली हो” या माझ्या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. ह्या संपूर्ण प्रवासात काही अत्यंत आनंदचे तर काही अतिशय खडतर असे क्षण आले. या सगळ्या प्रवासात मायबाप रसिक प्रेक्षकांची म्हणजेच तुमची साथ खूप महत्त्वाची होती, या तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि आशिर्वादामुळेच हे शक्य झालं आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमचा लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा हीच प्रार्थना”. योगेशने केलेल्या या पोस्ट आता सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!