Share

IND vs ENG : कॅप्टनला सोडून टीम इंडियाचे क्रिकेटपटू लंडनला पोहोचले; पाहा PHOTO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू लंडनला पोहोचले आहेत. यामध्ये माजी कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा अद्याप संघासोबत पोहोचू शकलेला नाही. तो आज म्हणजेच शुक्रवारी निघणार आहे.

या भारतीय खेळाडूंमध्ये ऑफ-स्पिनर रवीचंद्रन अश्विन, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि यष्टीरक्षक केएस भरत यांचा समावेश आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या समाप्तीनंतर इंग्लंडमध्ये भारतीय संघात सामील होईल.

रोहित शर्मा गुरुवारी वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत जाऊ शकला नाही. इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, तो आज शुक्रवारी लंडनला जाणाऱ्या विमानात बसणार आहे. भारत १ जुलैपासून एजबॅस्टन येथे कसोटी सामना खेळणार आहे. मागील वर्षी टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर हा कसोटी सामना होऊ शकला नव्हता. यानंतर तीन वनडे आणि तीन टी-२० सामनेही खेळवले जातील.

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंची कोविड-१९ साठी चाचणी करण्यात आली होती. लंडनला पोहोचल्यानंतर संघ लीसेस्टरला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!