Share

भारत-आयर्लंड मालिकेपूर्वी दिग्गज कॅप्टननं घेतला आयुष्यातील ‘मोठा’ निर्णय!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयर्लंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू विल्यम पोर्टरफिल्डने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयर्लंडसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये त्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. केविन ओब्रायनने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयर्लंडला २६ आणि २८ जून रोजी भारताविरुद्ध टी-२० सामने खेळायचे आहेत.

२००८ मध्ये ट्रेंट जॉन्स्टन यांच्याकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पोर्टरफिल्डने २५३ सामन्यात आपल्या देशाचे नेतृत्व केले आहे. २०१८ मध्ये आयर्लंडने पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला तेव्हा ३७ वर्षीय पोर्टरफिल्ड संघाचा कर्णधार होता. त्या कसोटीत आयरिश संघाने प्रभावी क्रिकेट खेळले.

पोर्टरफिल्डने नोव्हेंबर २०१९ मध्ये कर्णधारपद सोडले. ११ वर्षे तो या पदावर राहिला. नंतर त्याच्या जागी अँड्र्यू बालबर्नीला संघाची कमान देण्यात आली. २०१५च्या विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत एकूण ११ शतके ठोकली. त्याने कारकिर्दीतील शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यात तो गोल्डन डकवर बाद झाला. २००७च्या विश्वचषकात आयर्लंडने पाकिस्तानला पराभूत केले तेव्हाही पोर्टरफिल्डने सर्वांना प्रभावित केले.

विल्यम पोर्टरफिल्डने १४८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३४३ धावा केल्या. त्याने ६१ टी-२० सामन्यात १०७९ धावा केल्या आहेत. आयर्लंड हा कसोटी प्रकारातील सर्वात नवीन संघ आहे. यामुळे पोर्टरफिल्ड केवळ तीन कसोटी सामने खेळू शकला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!