🕒 1 min read
मुंबई : अलीकडेच आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघाची (indian cricket team) घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्याच वर्षी आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यामुळेच त्यांना या मोठ्या जबाबदारीची कमान देण्यात आली आहे. हार्दिक आयर्लंडविरुद्ध कर्णधार म्हणून मैदानात उतरताच ६३ वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.
१९५९ साली टीम इंडियासाठी ५ वेगवेगळ्या कर्णधारांनी टेस्ट फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवलं होतं आणि यावर्षीही हा मोठा विक्रम पाहायला मिळू शकतो. या वर्षात आतापर्यंत ४ कर्णधारांनी भारतीय संघासाठी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये कामगिरी केली आहे, ज्यामध्ये विराट कोहली टेस्ट मॅचमध्ये, केएल राहुल टेस्ट आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये, रोहित शर्मा सर्व फॉरमॅटमध्ये आणि अलीकडेच ऋषभ पंत टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून दिसला आहे. . हार्दिक पंड्या हा यावर्षी टीम इंडियाचा कर्णधार असलेला पाचवा कर्णधार असेल. भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ आणि २८ जून रोजी दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे एकदाच घडले आहे, जेव्हा एका वर्षात ५ वेगवेगळ्या खेळाडूंनी भारताचे नेतृत्व केले आहे. १९५९ मध्ये भारताने ९ कसोटी सामने खेळले, ज्यात विनू मांकड, हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, पंकज रॉय आणि गुलाबबाई रामचंद यांनी संघाचे नेतृत्व केले. या ९ कसोटींमध्ये भारताला फक्त एकच विजय मिळाला, जो गुलाबबाई रामचंद यांच्या नेतृत्वाखाली मिळाला. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला आणि उर्वरित ७ सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
