Share

Presidential election : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले राष्ट्रपती पदासाठी इच्छुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात सध्या राष्ट्रपती निवडणुकीमुळे राजकीय वातावरणात अनेक हालचाली होताना दिसून येत आहे. येणाऱ्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. आता बिग बॉसमधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रसिद्ध असलेला अभिजित बिचुकले याने राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.

“मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या आमदार- खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात असून मी बहुजन समाजातला आहे आणि कायद्याची माहिती असणारा आहे.”, असे अभिजित बिचुकले याने म्हटले आहे.

दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्यांनी लक्ष वेधून घेणाऱ्या अभिजित बिचुकले याने यापूर्वीही अशी विधाने केली आहे. यावेळी त्याने थेट राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान देशात सध्या या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!