मुंबई : अभिनेता किरण गायकवाड ‘लागीर झालं जी’ या मालिकेमधून घराघरात पोहचला आहे. त्याच्या उत्तम अभिनयशैलीमुळे तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. यामध्येच आता किरणची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
किरणने इन्स्टाग्राम बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. किरण खरंच इंस्टाग्राम बंद करणार का? असा प्रश्न सोशल मीडिया युजर्सला पडत आहे. किरणने एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यामध्ये म्हटले आहे की, “काही काळासाठी इंस्टाग्राम बंद, # भेटू लवकरच”. त्याचे वैयक्तिक कारण असल्यामुळे त्याने इन्स्टाग्राम बंद केले असावे असे देखील म्हणले जात आहे. पण चाहत्यांना याच खर कारण किरणचं सांगू शकतो.
https://www.instagram.com/p/Ceyn2t7AMBL/
किरणने २०१७ मध्ये ‘लागीर झालं जी’ भैयासाहेबाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तो घराघरात पोहचला होता. नंतर २०२० मध्ये तो देवमाणूस या मालिकेतून अजितकुमार देव या भमिकेतून प्रेक्षकांच्या भेटला आला.
महत्वाच्या बातम्या :


