Share

“मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग…” ; निलेश राणेंचा शरद पवारांना खोचक टोला

Published On: 

मुंबई : राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. या पदासाठी कोण उमेदवार असेल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. एनडीए आणि विरोधक नावांवरून भांडत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधी उमेदवार म्हणून लढवण्यास नकार दिला. दरम्यान भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.

“पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे. कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत. ते म्हणतील तुम्हाला, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग जिंकायची गरज काय, आजपासून तुम्ही राष्ट्रपती”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान काल मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा केली. ही बैठक सुमारे 20 मिनिटे चालली. या भेटीबाबत शरद पवार यांनी ट्विट करून लिहिले की, ममता बॅनर्जी आज माझ्या दिल्लीतील निवासस्थानी भेटल्या. आपल्या देशाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात बिगरभाजप पक्षांच्या बैठकीसाठी मंगळवारी दिल्लीत पोहोचल्या होत्या. आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती तयार करण्यासाठी बॅनर्जी यांनी आज (15 जून) रोजी बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी विरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले होते. या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पक्षाच्या वतीने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला या बैठकीला उपस्थित राहू शकतात. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची ही बैठक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!