मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा ‘पुष्पा’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. दरम्यान चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
पुष्पाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, अल्लू अर्जुन पुढील महिन्यापासून ‘पुष्पा द रुल’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे बजेटही ठरवले असून जुलैच्या अखेरीस त्याचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, ‘RRR’ आणि ‘KGF: Chapter 2’ सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, चित्रपटात मास एलिमेंट ठेवण्याचा दबाव सुकुमारवर खूप वाढला आहे, जेणेकरून हा चित्रपट दक्षिण आणि उत्तर भारतीय या दोन्ही प्रेक्षकांना आवडेल. अल्लू अर्जुनचे चाहते अजूनही चित्रपटाबद्दल जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

