सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून जात, धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. लोकांचे मुलभूत प्रश्न हे महागाई, अन्नधान्य आणि रोजगारी हे आहेत. या प्रश्नांकडे कुणाचं लक्ष नाही. सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही हनुमान चालिसा लावणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, अशाच मागण्या केल्या जात आहेत. या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? त्यांच्या भूकेचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल करत राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला.
“काही लोक भलत्याच मागण्या करताना दिसत आहेत. त्यामुळे आपण संभ्रमात पडतो. या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची भूमिका घ्यायची असेल तर शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे. सध्या सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. सभेत कुणी म्हणतं हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार… अशाने बेकारीचा आणि भुकेचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
आम्ही हनुमान चालिसा लावणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, अशाच मागण्या केल्या जात आहेत. या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? त्यांच्या भूकेचा प्रश्न सुटणार आहे का? pic.twitter.com/QS3ovcwQ7G
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 30, 2022
तसेच भटक्या विमुक्तांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रात काही चांगल्या संघटना आहेत. साताऱ्यात लक्ष्मण माने देखील हेच काम करतात. या सगळ्यांनी एकजूट व्हायला हवं. हिरालालजी तुम्ही यादृष्टीने विचार करावा. यात माझाही काही हातभार लागणार असेल तर सांगावे. मला त्यात सहभागी होण्यास अत्यंत आनंद होईल. असेही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


