Share

Winter Session 2022 | “…तर नाक दाबून तोंड उघडू” ; अमोल मिटकरी यांचा सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

Winter Session 2022 | नागपूर : राज्य सरकारमधील वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भागातील दहा शेतकऱ्यांची वाघ किंवा बिबट्याने दुर्दैवी शिकार केली. या मुद्याला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर त्यावर सभागृहात कोणीतीही चर्चा अथवा ठोस उपाययोजना होत नसतील आणि केवळ आझादी का अमृतमहोत्सव बोलत तोंडाची वाफ घालवण्याचा प्रकार सुरु आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली.

सत्ताधारी पक्ष केवळ वेळ काढूपणाचे काम करत आहे. त्यांना शेतकऱ्यांविषयी काही देणघेणं नसल्यामुळे अशा सरकारचा धिक्कार आहे असे ते म्हणाले. शिवाय विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर सभागृहात बोलू देत नसतील तर त्यांचे नाक दाबून तोंड उघडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला.

काल देखील अमोल मिटकरी यांनी सभागृहात विदर्भातील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर कोळशी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल  अमोल मिटकरी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे समाधानकारक मिळालेले नाही, याबद्दल मिटकरी यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या ओळींचा दाखला देत राज्य सरकारचे कान टोचले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!