🕒 1 min read
मुंबई : “देशात विमुक्त जाती व भटक्या जमाती, ओबीसी मधील उपेक्षित वर्ग आणि वंचित जाती जमातींना मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय शरद पवार यांच्याकडेच जाते,” असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जमाती सेल आयोजित कृतज्ञता सोहळा आणि मार्गदर्शन शिबिरामध्ये भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले, वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना विमुक्त जाती जमातींसाठी चार टक्के आरक्षण दिले आणि शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मंडळ आयोग लागू करून या जाती जमातींसाठी अकरा टक्के एवढे आरक्षण लागू केले. एवढेच नाही तर महाराष्ट्रात मंडळ आयोग शरद पवार यांनी लागू केला. आम्ही जालनाच्या समता परिषेदेत मागणी केली. आणि काही महिन्यातच मंडळ आयोगाच्या शिफारशी शरद पवारांनी लागू केल्या.
या कार्यक्रमात बोलताना भुजबळ पुढे म्हणाले, स्वातंत्रोत्तर काळात दलित जातींना आणि आदिवासी जमातींना शैक्षणिक, राजकीय आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये राखीव जागा देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केला शाहू महाराजांनी. या भारतात पहिल्यांदा शाहू महाराजांनी आरक्षण दिले. आता मात्र आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आपल्याकडे संविधानाने दिलेले आरक्षण काढण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. आरक्षण काढण्याच्या विचारात असलेल्यांच्या विरोधात आपण एक होऊन लढा दिला पाहिजे.
भटक्या जाती, विमुक्त जमातींसाठी राज्य सरकारने नवीन ६४ व्यावसायिक कृषी अभ्यासक्रमांच्या शिष्यवृतींना मान्यता दिली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राखीव जागा ठेवून त्यात प्राधान्य भटके विमुक्तांना दिले जाणार आहे. विजा- अ आणि भजा – ब या मागासप्रवर्गासाठी क्रेमेलेयरची अट रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे छगन भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
