Share

“स्वतःचे १४ आमदार टिकवता आले नाहीत”; अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

सोलापूर : सोलापूरमध्ये आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारसंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तोपर्यंत हे सरकार चालत राहणार, असा दावा अजित पवारांनी केला आहे. यासह अजित पवारांनी राज ठाकरेंवरही नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.

अजित पवार म्हणाले, “स्वतःचे १४ आमदार टिकवता आले नाहीत. नाशिककरांनी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात दिली. मात्र, तिथंही तेच… त्याच नागरिकांनी त्यांना नाकारले. आता हेच लोक स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही खटाटोप करत आहेत. हे आपणाला परवडणारे नाही अशांपासून तुम्ही सावधान रहा”.

पुढे बोलताना अजित पवारांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. म्हणाले, “ट्रान्सपोर्ट सबसिडी नसती दिली तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशातुन ट्रान्सपोर्ट आणि हारवेस्टिंगचे पैसे कापले जातात, म्हणजे ही शेतकऱ्यालाच मदत आहे. रिकव्हरी लॉस मधून २०० रुपये टनाला दिले तर शेतकऱ्याची रिकव्हरी जास्त राहणार आहे”. तसेच या सगळ्यावर देखरेख ठेवायला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय कारखानदारांसाठी नसून शेतकऱ्यांसाठीच घेतलेला आहे. शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये,त्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ येऊ नये, यंदाचा ऊस यंदाच संपवा ही महाविकास आघाडी सरकारची या मागची भूमिका आहे, असेही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!