Share

IPL 2022 RR vs MI : आज मुंबईला मिळणार का पहिला विजय? वाचा काय सांगतो राजस्थानविरुद्धचा इतिहास!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज डबल हेडरचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (RR vs MI) यांच्यात होणार आहे. हा सामना डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबई येथे संध्याकाळी साडेसातपासून खेळवला जाईल. मुंबई इंडियन्सला स्पर्धेतील आठ पराभवानंतर पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.

आयपीएलच्या १५व्या हंगामात, राजस्थान रॉयल्स संघ ८ सामन्यांतून ६ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्सने त्यांच्या गुणतालिकेत तळाशी आहे. आज कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळवायचा आहे.

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मोसमात जोस बटलरने तीन शतके झळकावली आहेत. त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर फ्लॉप ठरले आहेत. राजस्थानचा संघ गोलंदाजीतही मजबूत दिसत आहे.

आकडेवारीनुसार मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध १४ सामने जिंकले आहेत तर राजस्थान रॉयल्सने १३ सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द करण्यात आला आहे. गेल्या ९ सामन्यांपैकी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ६ वेळा पराभव केला आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २३ धावांनी विजय मिळवला.

मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक ५३६ धावा केल्या आहेत. रोहितने आतापर्यंत राजस्थानविरुद्ध दोन अर्धशतके झळकावली असून, ७३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. राजस्थान रॉयल्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार संजू सॅमसनने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक ५२१ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!