Share

Grampanchayat Election 2022 | संदीपान भुमरेंना मोठा धक्का! सरपंच पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचा मोठा विजय

Published On: 

🕒 1 min read

Grampanchayat Election 2022 | औरंगाबाद : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठी रविवारी मतदान पार पडलं. मंगळवार २० डिसेंबरला या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले.  दरम्यान आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडुळ ग्रामपंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

आमदार संदिपान भुमरे यांनी स्वत: सरपंच पदाचे उमेदवार बबन नाना ठाणगे यांना मतदान करण्याते आवाहन केले होते. मात्र तरी देखील त्यांचा सरपंच पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहीला. त्यामुळे भुमरे यांची चांगलीच फजिती झाली आहे.

पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची गावं मानली जातात. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा बिडकीनमध्ये पराभव झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार अशोक धर्मे यांचा सरपंचपदी विजय झाला आहे.

१८ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या बिडकीनमध्ये यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी चांगलाच जोर लावला होता. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी पॅनल उभं केलं होतं. अटीतटीच्या लढाईत बिडकीन ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली असून सरपंचपदासाठी अशोक धर्मे यांचा १२०० मतांनी विजय झाला आहे. त्यामुळं मंत्री संदीपान भुमरेंना स्वत:च्याच तालुक्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!