सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळाले. तद्पश्चात राणा दाम्पत्यास अटक झाली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हनुमान चालिसा म्हणायची तर घरीच म्हणा, तुमच्या घरी जागा कमी पडतेय का? असा सवाल केला आहे.
सोलापूरमध्ये आज (३० एप्रिल) शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणे दाम्पत्यावर टीका केली. ते म्हणाले की,‘राज्यात वातावरण खराब करण्याचे काम सुरू असून सध्या रमजान ईद सुरू आहे. सगळे नीट सुरू असताना हनुमान चालिसा म्हणायची तर घरीच म्हणा. तुमच्या घरी जागा कमी पडतेय का?’, असे पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत अजित पवार म्हणाले की,‘राज ठाकरेंना भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे हे सगळ्यांना समजत आहे. त्यामुळे वातावरण गढूळ करण्याचे काम हाणून पाडा’, असेही पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “इम्तियाज जलील यांनी आधी भोंगे हटवावे, आम्ही त्यांचा सत्कार करू” – संदीप देशपांडे
- “सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे तोपर्यंत…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- Jacqueline Fernandez: ईडीने केली जॅकलिनची 7 कोटींची संपत्ती जप्त; वाचा सविस्तर
- “लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या?”, फोटो पोस्ट करत मनीषा कायंदेंचा अमृता फडणविसांवर निशाणा
- IPL 2022 GT vs RCB : बलाढ्य गुजरातसमोर बंगळुरुचं आव्हान; डु प्लेसिसनं जिंकला टॉस!

