Share

“हिंदूंमध्ये फोडाफोड, मराठी-अमराठी वाद ही भाजपची चाल”; उद्धव ठाकरे  

Published On: 

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. म्हणाले, “आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची आहे. हिंदूंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी- अमराठी ही भाजपची चाल आहे.”

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान  टप्पा २ च्या निमित्ताने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र येथील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते, “येणाऱ्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. यावेळीही आघाडी सरकार निवडून येणार. पश्चिम बंगाल आणि केरळसारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न भाजप  करत आहे. बंगालचं मोठं कर्तृत्व आहे. यावेळी ममता दिदींनी गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची. हिंदूं मध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपची चाल आहे”.

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली म्हणाले, “संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने जागांसाठी फोडली. त्यामुळे यांचं मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळं स्वतः करता हवं आहे. साहेब म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे”.

“जन्मापासून शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या आणि बदल करा. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, असं करत शिवसेना वाढवायची आहे. शिवसैनिक अंगार आहे. त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही. फक्त त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत हे त्यांना समजू द्या. गावाची जनतेची कामंसुध्दा करून घ्या”. अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.

 महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!