Share

“उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या” ; रामदास आठवलेंची मागणी

Published On: 

जळगाव :  “राज्यसभा निवडणुकीत जोराचे प्रयत्न करूनसुद्धा महाविकासआघाडीला पराभवाचा स्वीकार करावा लागला. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रविवारी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. ही महाविकास आघाडी सरकारसाठी मोठी नामुष्की आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे २०२४ साली होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल, असे रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिल्यानेच भाजपकडून धनंजय महाडिक यांना निवडणुकीत उतरवले. धनंजय महाडिक यांचा विजयही झाला. अपक्षांची मते ही भाजपच्या पारड्यात पडली. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा मोठा अपमान झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. सत्तेतून बाहेर पडले पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!