Share

प्राजक्ता माळीची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, नेमकं काय आहे प्रकरण ?

Published On: 

मुंबई :  अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेत्री घराघरात पोहचली आहे. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा यामध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्याचबरोबर रानबाजार वेबसिरीजमुळे देखील प्राजक्ता चर्चेत आहे. आणि आता प्राजक्ता चा ‘वाया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताने नुकताच वाया या चित्रपटाचा टीजर इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “मार्गावरी काटे जरी असंख्य, मला जखमांची तमा नाही, लाख अडथळे आले तरी आता माघारी वळणे नाही…, आता मागे न पाहता पुढे जाणे गरजेचे आहे. ‘ती’ घेऊन येतेय ‘वाय’ चा ट्रेलर, उद्या!”, तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CetXOKNjSQQ/

या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत प्राजक्ता माळी दिसणार आहे. या चित्रपटाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांची आहे. त्याचबरोबर चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहे. हा चित्रपट २४ जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!