मुंबई : सलग दुसऱ्या टी-२० (IND vs SA) सामन्यात भारतीय संघाचा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे. पाहुण्या संघाला मालिकेवर कब्जा करण्यासाठी आता तीनपैकी एक सामना जिंकावा लागेल. संघाच्या पराभवावर भारतीय कर्णधार ऋषभ पंतने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ऋषभ पंत म्हणाला, ”आमच्या १० ते १५ धावा कमी होत्या. भुवी आणि वेगवान गोलंदाजांनी पहिल्या ७-८ षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. पण त्यानंतर आम्ही चुकलो. दुसऱ्या हाफमध्ये आम्हाला विकेट्सची गरज होती, पण तसे झाले नाही. क्लासेन आणि बावुमा यांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली. आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. पुढच्या सामन्यात आम्ही सुधारणा करू अशी आशा आहे. आता आम्हाला उर्वरित तीनही सामने जिंकायचे आहेत.”
Tests – 0 wins in 2 games
ODIs – 0 wins in 3 games
T20Is – 0 wins in 2 gamesTeam India have lost seven consecutive games against South Africa in 2022 ????????#RishabhPant #India #INDvsSA #Cricket #T20Is pic.twitter.com/oPAx9ES8H8
— Wisden India (@WisdenIndia) June 12, 2022
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत आणि वेगवान धावाही करू शकले नाहीत. टीम इंडियाला ६ गड्यांच्या मोबदल्यात १४८ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेनेही पहिले तीन विकेट्स लवकर गमावल्या. नंतर हेनरिक क्लासेनने भारतीय संघाला एकही संधी दिली नाही आणि वेगवान फलंदाजी केली. अर्धशतक झळकावल्यानंतरही तो त्याच शैलीत ८१ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे दक्षिण ६ विकेट्सवर १४९ धावा करून सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

