Share

अजित पवारांना ‘मिस्टर इंडिया’ म्हणणाऱ्या निलेश राणेंना विद्या चौहान यांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकाच्या निकालावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रियांनी सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. या निवडणुकीवर अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतेही विधान केले नाही. यावरूनच निलेश राणे यांनी त्यांना ‘मिस्टर इंडिया’ म्हणून डिवचले होते. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“निलेश राणे कोण आहेत? आम्ही ओळखत नाही. अजित पवार सदैव काम करणारे नेते आहेत,” असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान “अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता.

दरम्यान राज्यसभा निवडणुकीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली होती. काहीना ईडीची भीती तर काही जणांना वेगळी ताकद देऊन मत परिवर्तन केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावरही निलेश राणे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले.

“राष्ट्रवादीचे राज्यपाल रोहित पवार यांची प्रतिक्रिया बघितली. राज्यपाल रोहित पवार यांनी आजोबांकडे लक्ष द्यावे कारण आजोबा नेमके काय करतात हे कोणालाच सांगत नसल्यामुळे तुमच्या बरोबर महाविकास आघाडीची पण अडचण झाली आहे.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!