मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी गद्दारी केलेल्या आमदारांची नावे जाहीर केली आहेत. “आमदारांबद्दल आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, त्यांचा अपमान करण्याचा आमचा मानस नाही. कारण आमच्या हातात २ दिवस ईडी दिलं तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील.” अशी टीका राऊतांनी केली होती. आता यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे.
“या जगात प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवावी लागते. भीक मागून काहीच मिळत नाही. ED तर मुळीच नाही.”, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

दरम्यान, “राज्यसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने डावललं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंबाबत चिंता व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण या महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी मुंडे यांचा मोठा हात आहे.” असेही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “एक दिवस सत्य बाहेर येणार” ; सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- “अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे…”, निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला
- “..पण त्यामुळे आकाश कोसळले काय?”, आगामी विधान परिषद निवडणुकीवर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- IND vs SA 2022 : हेनरिक क्लासेनची ‘क्लास’ खेळी; दक्षिण आफ्रिकाचा ४ गडी राखून विजय
- ENG vs NZ : नाद नाद नादच..! जो रूटनं पुन्हा ठोकलं शतक; विराट आणि स्मिथची केली बरोबरी!


