Share

IND vs SA : भुवनेश्वर कुमारचा वन मॅन शो..! घातक गोलंदाजी करत रचले ‘हे’ विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेकडून (IND vs SA) दुसरा टी-२० सामनाही गमावला. आता टीम इंडिया मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. भारतीय चाहते टीम इंडियाच्या फलंदाजीवर नक्कीच नाराज होते, पण भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीने सामन्यादरम्यान काही आनंदाचे क्षण चाहत्यांना अनुभवता आले. भुवनेश्वरने पॉवरप्लेमध्ये आफ्रिकन फलंदाजांवर वर्चस्व राखले. मात्र, या शानदार गोलंदाजीमुळेही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही.

या सामन्यात भुवनेश्वरने ४ षटकात केवळ १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. आता भुवनेश्वर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे. २०१२ मध्ये भुवनेश्वरने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते आणि त्या सामन्यातही त्याने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट घेतल्या होत्या.

भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्यांच्या पुढे टिम साऊदी आणि नुवान कुलसेकरा आहेत, ज्यांच्याकडे अनुक्रमे ४२ आणि ३४ बळी आहेत. भुवनेश्वरच्या पॉवरप्लेमध्ये ३३ विकेट्स आहेत.

टी-२० सामन्यात पहिल्या षटकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वरही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खालोखाल पाकिस्तानचा सोहेल तनवीर आहे. त्याच्या नावावर एकूण ३६ विकेट्स आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वरच्या नावावर ३१ विकेट आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मोहम्मद आमिर आणि डेव्हिड विली आहेत, ज्यांच्या नावावर ३०-३० विकेट्स आहेत.

जसप्रीत बुमराहने टी-२० सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक २६ फलंदाजांना बोल्ड केले आहे. यात भुवी आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने एकूण १८ फलंदाजांना बोल्ड केले आहे. युझवेंद्र चहलच्या नावावर १५ बोल्ड विकेट आहेत. भुवनेश्वरने ६१ टी-२० सामन्यांमध्ये, भारतासाठी ६३ बळी घेतले आहेत आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीयांच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!