मुंबई : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्रात महत्वाचा मानला जाणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधारकांना चांगलंच धारेवर धरलं होतं. यावर सत्ताधारकांनी स्पष्टीकरण दिलं असून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. अशातच भाजप पक्षाने काल फेसबुक द्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने लिहलेल्या एका पत्राचा फोटो शेअर करत युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तोच फोटो शेअर करत आता भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे.
आशिष शेलार यांचे आरोपः
ठाकरे सरकारच्या अडिच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला, असा आरोप आशिष शेलारांनी केला आहे. हा घ्या सरकारी पुरावा असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने लिहलेल्या एका पत्राचा फोटो शेअर केला आहे.
पाहा ट्विटः
ठाकरे सरकारच्या अडिच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला…हा घ्या सरकारी पुरावा
प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता?
अडिच वर्षे कंपनीला का लटकवले?
टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का?
चौकशी झालीच पाहिजे!
1/2 pic.twitter.com/aMXYhVPxqJ— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 27, 2022
चौकशी झालीच पाहिजेः
प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडिच वर्षे कंपनीला का लटकवले टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का? असे सवाल केले असून चौकशी झालीच पाहिजे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
पाहा ट्विटः
या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी!
चौकशीला समोरे जा…अजून बरेच निघेल!
अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये?
2/— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 27, 2022
आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावीः
दरम्यान, या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी देखील आशिष शेलारांनी केली आहे. तसेच चौकशीला समोरे जा, अजून बरेच निघेल, अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये?, असा इशारा देखील त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Rathod | संजय राठोडांच्या कृतघ्नतेने महंत दुखावले, सुनील महाराज शिवबंधनात अडकणार
- Shivsena | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष! आज घटनापिठापुढे होणार ‘सुप्रिम’ सुनावणी
- Shivsena । बाळासाहेबांचे आवडते थापा, शिंदे गटात का गेले? यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
- Shambhuraj Desai | लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत ; शंभूराज देसाई यांचे निर्देश
- Virat Kohli । “विराट कोहलीचा फॉम परत आलाय,” भारताच्या या माजी खेळाडूचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

