🕒 1 min read
मुंबई : वेदांता प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं आहे. अशातच बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांचा अजित पवार यांच्यावर आरोपः
राष्ट्रवादी सत्तेत असताना पश्चिम महाराष्ट्र आणि साखर उद्योगाच्या पलिकडे विचारच केला नाही असं म्हणत महाविकास आघाडी सरकार असताना फॉक्सकॉन प्रकल्पाला तात्काळ क्लोजर का केला नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.
अजित पवारांनी या प्रोजेक्टचा क्लोजर रिपोर्ट का दिला नाही, असा सवार अंबेडकरांनी उपस्थित केला असून या प्रकल्पला 12 हजार कोटींची सबसिडी म्हणा किंवा बेनिफीट देणार होते, तर दुसरीकडे 26 हजार कोटी वार्षिक उत्पन्न होईल, असं सांगितलं जात आहे. पण या ज्या नऊरत्न कंपन्या आहेत, या कंपन्यांचं जेवढं उत्पन्न आहे, अजून केंद्राला सुद्धा नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाः
महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असल्याचा आरोप प्रकाश यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उकाईचं पाणी सुद्धा गुजरातला गेलं होतं, त्यामुळे नवीन काही नाही, जिथे जिथे फडणवीस असतील तिथे हे प्रश्न येतील, भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आलं तेव्हा अर्धे प्रकल्प हे गुजरातलाच गेलं असल्याचं म्हणत आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली.
दरम्यान, हा प्रकल्प नक्की महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लघू उद्योग आले पाहिजेत, त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला मोठा हातभार लाभेल, अस प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्याः
- Jayant Patil | “कंपनीला जे सांगितलं जात आहे तेच ट्विट केलं जात आहे, जनतेला…” जयंत पाटील कडाडले
- Vedanta-Foxconn । “वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला गेला, याला जबाबदार शिवसेनेचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई हे आहेत”
- Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ पिठाची भाकरी खा…
- Eknath Khadse | राज्यसरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा – एकनाथ खडसे
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ! भोसरी भुखंड घोटाळा प्रकरणी अँन्टी करप्शन कोर्टात होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
