Share

Nirmala Sitaraman | “वेदांता वरुन रान उठवताय, तुमच्या काळात…”, निर्मला सीतारमन कडाडल्या

Published On: 

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना महाविकास आघाडी सरकार वर निशाणा साधला आहे. वेदांता फॉक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याने विरोधकांनी सत्ताधारकांवर जोरदार हल्लाबोल केला. यालाच निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिलं असून महाविकास आघाडी सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

निर्मला सीतारामन यांचा महाविकास आघाडी सरकार वर निशाणाः

केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात का येऊ दिले नाही?, वेदांत फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याने विरोधक रडत आहेत, पण त्यांनी आधी याचं उत्तर द्यावं की केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात का येऊ दिले नाहीत, महाविकास आघाडी सरकार याला जबाबदार आहे, असा गंभीर आरोप निर्मला सीतारामन यांनी यावेळी केला.

याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणार होतं म्हणून हा प्रकल्प थांबवण्यात आलाः

नाणार सारखा प्रकल्प जी आशियामधील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी होती त्याला कोणी रोखलं? तसेच आरे मेट्रो कार शेड सारखा प्रकल्प होऊ दिला नाही, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला, हे सर्वांना माहिती आहे हा प्रकल्प झाला असता तर याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणार होतं म्हणून हा प्रकल्प थांबवण्यात आला असल्याचं यावेळी निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातून एक प्रकल्प गेल्याने विरोधक आज इतकं रडत असून देशाचे प्रमुख चार प्रकल्प कोणी थांबवले याचं उत्तर महाविकास आघाडी सरकारने द्याव, मगच आम्हाला प्रश्न विचारावा असा टोला देखील सितारामन यांनी लगावला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट झाली असली तरी बाकीच्या देशात चलनाच्या तुलनेत रुपयांनी डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली असल्याचं निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!