लोणावळा : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे सर्व पक्षांची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची तयारी सुरू झालेली पाहायला मिळतं आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षाची युती करणाय याचविषयी सगळीकडे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमिवर भाजप-मनसे आणि शिंदे गटाची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच या युतीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे.
रामदास आठवले यांचे वक्तव्य-
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने मनसेला भाजपने सोबत घेऊ नये, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. रविवारी लोणावळ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची राज्य कार्यकारणीची बैठक झाली. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आरपीय उद्धव ठाकरे यांचे मुंबईवरील वर्चस्व संपवून टाकण्यासाठी, आगामी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना पाठिंबा देणार असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, आरपीआयच्या कारयकारणीच्या बैठकीमध्ये आरपीआयचे नवोदित प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, प्रदेश युवकाध्यक्ष पप्पू कागदे, आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस जितेंद्र बनसोडे देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | शिवसेनेतील बंडावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य! म्हणाले, एक व्यक्ती जबाबदार
- Shinde-Fadanvis | वर्षावर हालचाल! शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तब्बल पावणे दोन तास चर्चा
- Shahajibappu Patil | “आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे”
- Sharad Pawar | शरद पवारांच्या एन्ट्रीवर वाजलं अजीम-ओ-शान-शहंशा गाणं अन् भाजपना सोडला टीकेचा बाण
- Chandrasekhar Bawankule | पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हवेत? ; चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

