ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातले विस्तव जाता जात नाहीये. दोघांमध्ये सुरु असलेले आरोप – प्रत्यारोप आता पुन्हा एकदा धारधार होताना दिसत आहे. नारायण राणे हे महसूल मंत्री असताना झालेल्या एका व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश ठाण्यातील लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाला असून, ही जमीन कवडीमोल भावाने विकले, असे तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणी संपूर्ण कुटुंबाशी चौकशी करावी. बेहिशोबी मालमत्ता सीज करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होती. या मागणीचा विचार होऊन ही चौकशी होणार असल्याचे समजते.
माहिती अधिकारी कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यात म्हंटले आहे की, नारायण राणेंनी महसूलमंत्री असताना एक व्यवहार केला होता. राज्य शासनाच्या जमिनीवर एक प्रीमियर कंपनी होती. या कंपनीवर १६६ कोटींचा बोजा होता. याच कंपनीची ८६ एकर जमीन अवघ्या १२ कोटी रुपयांना अनंत डेव्हलपर्स बिल्डरला विकण्यात आली. विशेष म्हणजे खोटा जीआर करून जमीन विकली. असा राणे यांच्यावर आरोप आहे.
नारायण राणे यांनी डोंबिवलीमधील अनेक शेतकऱ्यांची आणि राज्य सरकारच्या जमिनी अनंत डेव्हलपर्स या बिल्डरला विकल्या. या व्यवहारप्रकरणी राणे कुटुंबाच्या महाराष्ट्र, गोवा आणि लंडनमधील संपत्तीची चौकशी करावी. अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. अखेर ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी आधी राणे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

