Share

IPL 2022 : इशान किशनला मिळणार शिक्षा? रागा-रागात केलेली ‘ती’ गोष्ट येणार अंगाशी; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये इशान किशन वाईट टप्प्यातून जात आहे. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने इशान किशन याला मेगा लिलावात १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएलच्या या मोसमात त्याची सुरुवात चांगली झाली होती, पण त्यानंतर तो आपल्या फॉर्मपासून दूर गेला. इशानने मुंबईतील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद ८१ धावांची खेळी केली होती. आता इशानला एका चुकीमुळे शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने ही चूक केली.

लखनऊ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सने पराभव चाखला. हा मुंबईचा सलग सहावा पराभव ठरला. या सामन्यात मुंबईला विजयासाठी २०० धावांची गरज होती, पण मुंबईने आपला सलामीवीर इशान किशनला स्वस्तात गमावले.

यावेळी इशान किशनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो १७ चेंडूत केवळ १३ धावा करू शकला आणि डावाच्या ७व्या षटकात मार्कस स्टॉइनिसने त्याला बाद केले. तंबूत परतताना त्याने सीमारेषेवर आपला राग काढला. त्याचे हे वर्तन आचारसंहितेच्या उल्लंघनात येऊ शकते. असे झाल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. इशानने ६ डावात ३८.२०च्या सरासरीने १९१ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/SlipDiving/status/1515312841880125444?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515312841880125444%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2022-ishan-kishan-smashed-boundary-cushions-with-the-bat-might-be-fined-4198061.html

सामन्याबाबत…

आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावलेल्या केएल राहुलच्या लखनऊने दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २० षटकात २०० धावांचे आव्हान दिले. मुंबईच्या गोलंदाजी विभागात पुन्हा गफलत पाहायला मिळाली, शिवाय क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे राहिले. लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजीही ढेपाळली. २० षटकात मुंबईला ९ बाद १८१ धावांपर्यंतच पोहोचता आले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!