Share

Narayan Rane | “…तेव्हा नाही का वाटली लाज?”, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर काव्यमय टीका

Published On: 

Narayan Rane | मुंबई : भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार घणाघात केला. तसेच राणेंनी ठाकरेंवर काविता देखील केली. या कवितेचं शिर्षीक “… तेव्हा नाही का लाज वाटली”, असं आहे.

“वाझे सारखे वर्दीतले गुंड जेव्हा तुम्ही पाळले होते, वसुलीचा वाटा घ्यायला हात तुमचे सरसावले होते. अडीच वर्षात लूट केली परवा नव्हती कुणाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”
“कोविडची कंत्राटं युवराजाच्या आदेशाने मिळवली, माणसं मरताय कधी खुर्ची नाही सोडली. मेवा खाणे वृत्ती तुमची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”
“औरंगजेबच्या कबरीवर फुलं उधळली गेली, सत्ता हाती असताना अटकेची हिंमत नाही झाली. छत्रपतींच्या मातीत महती गायली टिपू सुलतानाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”
“मातोश्री दोनचा टॉवर बघा कसा उभा केला, रिसॉर्ट बांधताना कायदा पायदळी तुडवला. मराठी माणूस मुंबईच्या खड्ड्यातच गेला, पाहा तरी एकदा बदली कशीकशी केली कुणाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”
“अवकाळी पावसाचं उभं पीक होतं झोडपलं, बांधावर ५० हजार देण्याचं आश्वासन पण दिलं, विमा कंपन्या बळीराजाला लुटताना घेतली होती का बिनपाण्याची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”
“दाऊदच्या प्रॉपर्टीत मंत्री हिस्सेदार बनला, राजीनामा तर दूर उलट ऐटीतच बसला. कुणाच्या कृपने चंगळ होती अशा खानदानाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”
“मराठा, ओबीसी, आरक्षण होतं गमावलं, सत्ता राखण्याच्या नादात सत्य मात्र लपवलं. मुका मोर्चा म्हणत खिल्ली उडवली त्या समजाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

या कवितेनंतर पन्हा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. कितीवेळा लाज जनाची नाही मनाची, एखादा माणूस संन्यास घेऊन घरी बसेल. किती लाज काढली आहे, किती प्रकरणं आहेत. ही कविता लोकांपर्यंत पोहचवा. अडीच वर्षे या महाराष्ट्राला जो कलंक लागला होता, तो कसा होता हे लोकांना कळू द्या. परत अशी चूक लोकं करणार नाहीत, याची ते खबरदारी घेतील म्हणून ही कविता वाचून दाखवली आहे, असं राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!