मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आज दुपारी पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना (PBKS vs SRH) खेळवला जात आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शिखर धवन आज पंजाबचे नेतृत्व करत आहे. त्यांचा नियमित कप्तान मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त असून त्याची जागा प्रभसिमरन सिंगने घेतली आहे.
पंजाब किंग्ज संघ ५ सामन्यांत ३ विजय आणि २ पराभवांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पंजाबकडून शिखर धवनने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनच्या बॅटमधूनही धावा झाल्या आहेत. राहुल चहरने आपल्या गोलंदाजीत छाप पाडली आहे. दुसरीकडे, हैदराबादसाठी अभिषेक शर्माने प्रभावी कामगिरी केली आहे. टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार गोलंदाजीत प्रभाव पाडू शकतात.
#SRH have won the toss and they will bowl first against #PBKS.
Live – https://t.co/WC7JjTqlLB #PBKSvSRH #TATAIPL pic.twitter.com/RjoZ8w6KEL
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
दोन्ही संघांची Playing 11
पंजाब किंग्ज – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जानसेन, उमरान मलिक, टी. नटराजन.
सनरायझर्स हैदराबाद – शिखर धवन (कप्तान), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

