पुणे : आज पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी १ मे ला महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे आपण जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली. यासह ५ जून रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्याला जाणार असेही सांगितले. तसेच भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून हा सामाजिक विषय आहे यावरही राज ठाकरे बोलले.
म्हणाले, भोंग्यांचा त्रास हा हिंदूंनाच होतो असं नाही तर मुस्लिमांना ही त्रास होतो. ५ जून ला आपला अयोध्या दौरा आहे. हिंदू बांधवांनी तयारीत राहावं असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लाऊडस्पीकरच्या वादावर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता खिल्ली उडवली. आता महाराष्ट्रातही नवे हिंदू ओवेसी तयार झाले आहेत, भाजपने महाराष्ट्रात जसा वापर केला तसाच ओवेसींना यूपीमध्ये वापरायचा आहे, पण आम्हाला काही टेन्शन नाही. जनता सर्व काही जाणते, सहन करते आणि प्रतिसाद देते असा टोला लगावला होता. यावर पत्रकारांनी राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता, “मी लवंडे बद्दल बोलणार नाही”. असा संजय राऊतांना पुन्हा टोला राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत लगावला.
महत्वाच्या बातम्या –


