Share

Narayan Rane | “बाळासाहेबांना सावकरांबद्दल सन्मान होता तो उद्धव ठाकरेंना आहे का?”; नारायण राणेंचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

Narayan Rane | मुंबई : सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. त्यांनी काँग्रेसविरोधात ब्रिटिशांसोबत काम करण्याचं मान्य केलं होतं. तसेच, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय.

“सावरकारांबद्दल आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपले परखड विचार मांडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही दैवत मानतो. मग त्यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांना जो आदर होता, सावकरांबद्दल सन्मान होता तो उद्धव ठाकरेंना आहे का?”, असा खोचक सवाल नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात आला तेव्हा आदित्य ठाकरे यांना मिठी मारली. तेव्हा आदित्य ठाकरे त्याच्या कानात सावकरांचा अपमान केल्याबद्दल वेल डन बोलले असतील. ठाकरेंची सावरकर आणि हिंदुत्त्वाविषयी काय भूमिका आहे? सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्त्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यांनी हिंदुत्त्वाशी गद्दारी केली. त्यामुळे आता त्यांना हिंदुत्त्व हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही. आता त्यांनी वीर सावरकरांची कितीही माफी मागितली तरी फायदा होणार नाही, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले.

पुढे ते म्हणाले, “आंदोलनं आणि उद्धव ठाकरेंचा काहीच संबंध नाही. कधी आले, पाहीलं, सहभाग घेतला असं नाही. शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात काही योगदान नाही. मराठी माणसावर जर कुठे अन्याय होतोय, दंगल होतोय, मराठी माणूस मार खातोय तर तिथे हे कधीच आयुष्यात गेले नाहीत म्हणून मग त्यांनी याबद्दल बोलूच नये.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!