Share

“मी विराटला बॉलिंग केली असती, तर…”, पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं कोहलीबाबत ‘धक्कादायक’ वक्तव्य!

Published On: 

मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (shoaib akhtar) नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो भारतीय क्रिकेट (team india) आणि खेळाडूंबद्दल काही ना काही वक्तव्य करत राहतो. अलीकडेच त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल (virat kohli) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी केली असती, तर त्याने इतक्या धावा केल्या नसत्या, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी विराट कोहलीने शोएब अख्तरबाबत मोठी प्रतिक्रिया दिली होती. शोएब अख्तरचा सामना करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही, असे तो म्हणाला होता. २०१० मध्ये श्रीलंकेत झालेल्या सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते, पण जोपर्यंत शोएब अख्तर गोलंदासाठी आला तोपर्यंत विराट कोहली बाद झाला होता. वयाच्या त्या टप्प्यावरही तो खूपच धोकादायक दिसत होता. जेव्हा तो त्याच्या शिखरावर होता तेव्हा कोणीही त्याला तोंड देऊ इच्छित नव्हते, असे विराटने म्हटले होते.

आता शोएब अख्तरने आता विराट कोहलीच्या त्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तर म्हणाला, ”विराट कोहली एक चांगला माणूस आणि एक महान क्रिकेटर आहे. मोठे खेळाडू अनेकदा मोठ्या गोष्टी करतात. त्याबद्दल मला त्याचे आभार मानायचे आहेत. मी त्याच्याविरुद्ध खेळलो असतो, तर त्याने इतक्या धावा केल्या नसत्या, पण त्याने केलेल्या धावांची संख्या विलक्षण ठरली असती. त्या धावांसाठी त्याला झगडावे लागले. जरी त्याच्याकडे ५० शतके नसती आणि त्याला २० किंवा २५ शतके करता आली असती, तरी त्या शतकांचे महत्त्व जास्त असते. मी विराट कोहलीकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली असती.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!