🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या राणेंना धारेवर धरत आहेत. अशातच त्यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
प्रिय नीतू बाळा, तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्कची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरापट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास, पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
यादरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस? किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नसल्याचं त्या म्हणाल्या.
दरम्यान, मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे. भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या बाबांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच, असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?, हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन?, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “सुपारीबाज आंदोलनं बंद करा”; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- Aravind Sawant | “ज्या डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंवर उपचार केले…”; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर
- Ambadas Danve | राज ठाकरे भाजपचीच भूमिका मांडत आहेत – अंबादास दानवे
- Winter Health Care | हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Sanjay Raut | “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर…”; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
