मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्रात शांतता आहे पण काल या महाराष्ट्रात शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस शांत आणि संयमी आहेत. आम्ही तणावाचं वातावरण होऊ दिले नाही. यापुढेही होऊ देणार नाही” असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, “राम आणि हनुमानाच्या नावाने दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता. नवे हिंदू ओवेसी ते करत आहेत. महाराष्ट्रातील हिंदू ओवेसी कोण आहेत, हे भोंग्यांच्या मुद्द्यावरून वरून स्पष्ट झालं आहे. या विषयावर निवेदन दिलं जाऊ शकत होतं. चर्चा केली असती. पण भाजपच्या मनातील राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी भोंग्याचं वातावरण सुरु होतं.”
“कालच्या निकालाने त्याला थारा दिला नाही. उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने ओवेसीला पुढे केलं, तेच काम भाजप महाराष्ट्रात नव हिंदू ओवेसींकडून करून घेत आहे.” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता केली.
“राज्यातील वातावरण दंगल सदृश्य करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी तो उधळून लावला. महाराष्ट्रातील जनता असे षडयंत्र उधळून लावेल. महाराष्ट्रातील एकतेला,धार्मिकतेला चूड लावण्याचा प्रयत्न करू नये,” असे देखील संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

