Share

Bihar | काँग्रेस नितीश कुमारांना युपीएचे संयोजक पद देणार?, तर शरद पवारांसाठी हि धोक्याची घंटा असणार?

Published On: 

🕒 1 min read

Bihar | पटना : बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप असला असून जदयूने भाजपशी युती तोडली. नितीशकुमार यांनी राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जेडीयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. नव्या सरकारला १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता बिहारमध्ये नितीशकुमार यांनी सावध भूमिका घेत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

राजद, काँग्रेस, डावे आणि अपक्ष आमदारांचे संख्याबळ जमवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा दावा सांगितला. महाआघाडीच्या या सरकारमध्ये राजदचे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. बिहारमधील राजकीय परिस्थितीचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष बनवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपविरोधात लढण्यासाठी नितीश कुमारांवर युपीएअंतर्गत काँग्रेसकडून मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. युपीएचे संयोजक पद नितीश कुमारांना मिळेल, असे बोलले जात आहे.

आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांची संयोजक पदी निवड झाल्यानंतर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण युपीएमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रभावी नेते मानले जातात. आता नितीश कुमारांवर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बिहारच्या राजकीय परिथितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले कि, भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवते. सेना-भाजप एकत्र होते. मात्र आता काय परिस्थिती आहे, सेनेच्या या मित्र पक्षाने सेनेवर आघात केला. तिकडे नितीश कुमार हे लोकांच्यात मान्यता असलेले नेते आहेत. मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत भाजपापासून अंतर ठेवत बाजूला झाले. तसेच नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले, की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजपा हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील. नितीश कुमारांची तक्रार आहे, तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!