🕒 1 min read
मुंबई : आज (बुधवार) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. भाजप मित्रपक्षांशी विश्वासघात करतो, नितिश कुमार यांचीही तीच तक्रार आहे. महाराष्ट्रातही भाजपने शिवसेनेशी तेच केले. महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ भाजपचे अध्यक्ष असलेले आणि आता शरद पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार असलेले एकनाथ खडसे यांनीही महाराष्ट्रात शिंदे यांची बंडखोरी पाहून नितीशकुमार सावध झाले आणि भाजपपासून वेगळे झाले, असेच विधान केले आहे. अशाप्रकारे बिहारमधील एनडीएचा सर्वात जुना मित्रपक्ष नितीशकुमार यांचा जेडीयूही एनडीएतून बाहेर पडला आहे. भाजपने एक राज्य मिळवले तर दुसरे गमावले, अशी सध्या स्थिती आहे. दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
अतुल भातखळकर म्हणाले, “भारताच्या राजकारणामध्ये जनतेचा विश्वासघात करुन पक्ष बदलणारे शरद पवार भीष्म पितामह आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे, नितिश कुमार यांना समर्थन करणे. हे अत्यंत स्वभाविक आहे. पण शरद पवार हे विसरले की ज्या कारणामुळे त्यांनी वेगळा पक्ष काढला. त्या कारणाला विसरुन ते काँग्रेस सोबत युती करुन राज्यात सत्तेवर आले होते. त्यानंतर केंद्रामध्ये सुद्धा कृषिमंत्री झाले. शरद पवार आणि विश्वासहार्यता याचा छत्तीसचा आकडा महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. त्यामुळे देशात त्यांच्या वक्तव्याकडे कोणी लक्ष देत नाही.”
अतुल भातखळकर यांचा आरोप-
“नितिश कुमार यांना भाजपने संपवण्याचा प्रयत्न केला हे हास्यास्पद विधान आहे. शरद पवार याचे समर्थनच करणार कारण त्यांनी १९८५ मध्ये पुलोदच्या निवडणुका लढवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस कायम काँग्रेसला पाण्यात पाहते. तसेच काँग्रेसला संपवत आहे,” असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मित्रपक्षांना कमकुवत करण्याचा भाजपचा डाव-
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीही 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिल्याचे सांगतात. मात्र शिवसेनेशी गद्दारी करून शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. पण शरद पवार आणि एकनाथ खडसे हे भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत आहेत. आपल्या मित्रपक्षांना कमकुवत करण्याचा आणि त्यांना गिळंकृत करण्याचा भाजपचा डाव आहे, असे या दोघांचे मत आहे. शिवसेना फुटताना पाहून नितीशकुमार आधीच सावध झाले आणि त्यांनी आपला पक्ष वाचवला, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे; बिहार मधील राजकीय परिस्थितीवर शरद पवारांच मोठं वक्तव्य
- BJP vs Shivsena | ‘आमच्याशी विश्वासघात केल्याचे परिणाम शिवसेना भोगत आहे’; भाजप नेत्याचं जाहीर वक्तव्य!
- Nana Patole । “कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण… “; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी ‘या’ तीन खेळाडूंना नाही जागा, टी-२० विश्वचषक खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
- Pravin Darekar | मंत्रीमंडळ विस्तारावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
