Share

Sharad Pawar । हळूहळू मित्रपक्षांना संपवायचं हीच भाजपाची रणनिती; शरद पवारांची गंभीर टीका

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | बारामती : बिहारमध्ये जेडीयूचे नितीश कुमार आणि आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी राजभवन गाठून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आता या महाआघाडीचा शपथविधी सोहळा आज १० ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पटणा येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नव्या सरकारला १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. शावेळी बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना फुटीबाबत मोठं वक्तव्य केलंय. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

शरद पवार म्हणाले कि, भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवते. सेना-भाजप एकत्र होते. मात्र आता काय परिस्थिती आहे, सेनेच्या या मित्र पक्षाने सेनेवर आघात केला. तिकडे नितीश कुमार हे लोकांच्यात मान्यता असलेले नेते आहेत. मात्र त्यांनी सावध पवित्रा घेत भाजपापासून अंतर ठेवत बाजूला झाले, असे शरद पवार म्हणाले. भाजपाला दगा दिला म्हणून शिवसेना फोडल्याचे वक्तव्य सुशील मोदी यांनी केले होते, त्यावर शरद पवारांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली.

तर पुढे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपाचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. परंतु नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असेही शरद पवार म्हणाले. भाजपाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले, की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजपा हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील. नितीश कुमारांची तक्रार आहे, तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे, असंही पवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते सुशील मोदी ?

बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना फुटीबाबत मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रातील सत्ताबदलाचा पार्श्वभूमीवर आणि बिहार मधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर घेत सुशील मोदी म्हणाले कि, नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलात जो मान मिळणार नाही तो त्यांना भाजपसोबत असताना मिळाला होता. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधीही केला नाही, असं ते म्हणाले. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडलं. महाराष्ट्रात शिवसेनेनं आमच्यासोबत विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम ते आज भोगत आहेत, अशा शब्दात सुशील मोदी यांनी शिवसेना फोडल्याबाबत वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!