🕒 1 min read
Sharad Pawar | पटणा: महाराष्ट्रातील राजकीय भूकंपनानंतर आता बिहारमध्ये देखील सत्ताबदल होणार आहे. जेडीयूचे नितीश कुमार आणि आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी राजभवन गाठून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आता या महाआघाडीचा शपथविधी सोहळा आज १० ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पाटणा येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नव्या सरकारला १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. यानंतर बिहारमधील राजकीय परिस्थितीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपाचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. परंतु नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असेही शरद पवार म्हणाले. भाजपाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले, की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजपा हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील. नितीश कुमारांची तक्रार आहे, तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, दुसरीकडे बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना फुटीबाबत मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रातील सत्ताबदलाचा पार्श्वभूमीवर आणि बिहार मधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर घेत सुशील मोदी म्हणाले कि, नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलात जो मान मिळणार नाही तो त्यांना भाजपसोबत असताना मिळाला होता. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधीही केला नाही, असं ते म्हणाले. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडलं. महाराष्ट्रात शिवसेनेनं आमच्यासोबत विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम ते आज भोगत आहेत, अशा शब्दात बिहारमधील भाजप नेते सुशील मोदी यांनी शिवसेना फोडल्याबाबत वक्तव्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP vs Shivsena | ‘आमच्याशी विश्वासघात केल्याचे परिणाम शिवसेना भोगत आहे’; भाजप नेत्याचं जाहीर वक्तव्य!
- Nana Patole । “कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण… “; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी ‘या’ तीन खेळाडूंना नाही जागा, टी-२० विश्वचषक खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
- Pravin Darekar | मंत्रीमंडळ विस्तारावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
- T20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी ‘या’ दोन युवा गोलंदाजांमध्ये चुरस


