🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स भारतातील इलेक्ट्रिक वाहन विभागाचे नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. आपल्या EV कारच्या उत्पादनाला गती देण्यासाठी, कंपनीने फोर्ड इंडियाचा साणंद, गुजरातमधील प्लांट विकत घेतला आहे. कंपनीने प्लांट ताब्यात घेण्यासाठी त्यांचे भागीदार टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEML) आणि फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FIPL) यांच्यासोबत युनिट ट्रान्सफर करार (UTA) केला आहे. यामुळे फोर्डच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण टाटा सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवणार आहे.
टाटा मोटर्स लिमिटेडने फोर्ड इंडियाचा हा प्लांट $91.5 दशलक्ष (अंदाजे 726 कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्यासाठी रविवारी करार केला आहे. टाटा मोटर्सच्या टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEML) आणि फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FIPL) यांच्यातील करारा अंतर्गच जमीन, मालमत्ता आणि सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
टाटाच्या म्हणण्यानुसार, साणंद येथील या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता 3 लाख युनिट्स आहे, जी दरवर्षी 4 लाख 20 हजार युनिट्सपर्यंत वाढवता येऊ शकते.
फोर्डने देशातील उत्पादन बंद केले होते –
फोर्डने गेल्या वर्षी देशातील उत्पादन बंद केले होते आणि त्यावेळी कंपनीचा देशाच्या प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत 2 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा होता. दोन दशकांहून अधिक काळ कंपनीने देशाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फोर्ड इंडियाचा हा वाहन असेंब्ली प्लांट 350 एकरांवर बांधला गेला आहे आणि इंजिन निर्मितीचा प्लांट 110 एकरमध्ये पसरलेला आहे.
टाटा फोर्ड कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार-
फोर्ड इंडियामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे सुमारे २३००० कर्मचारी आहेत. टाटा मोटर्सने साणंद येथील फोर्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याबाबत बोलले आहे. याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. टाटा मोटर्सने फोर्डचा प्लांट खरेदी केल्यानंतर जमीन हस्तांतरण दर माफ करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar । हळूहळू मित्रपक्षांना संपवायचं हीच भाजपाची रणनिती; शरद पवारांची गंभीर टीका
- Sadabhau Khot | कोणताही घटकपक्ष नाराज होणार नाही, कारण… – सदाभाऊ खोत
- Sharad Pawar | “शरद पवार हे पलटीमार राजकारणाचे भीष्म पितामह” ; भाजप आमदाराची खोचक टीका
- Sharad Pawar | नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे; बिहार मधील राजकीय परिस्थितीवर शरद पवारांच मोठं वक्तव्य
- BJP vs Shivsena | ‘आमच्याशी विश्वासघात केल्याचे परिणाम शिवसेना भोगत आहे’; भाजप नेत्याचं जाहीर वक्तव्य!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
